Breaking News

जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही
जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही

Digital Kolhapur News Portal

मुंबई :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आजपासून दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात अमित शाह हे मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. मात्र या दौऱ्यावरुन संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर मोठा हल्लाबोल केला. अमित शाहांनी महाराष्ट्रात दळभद्री राजकारण केलं. महाराष्ट्र कमकुवत करुन इथले उद्योग गुजरातला पळवले. आता ते ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला येत आहेत. मात्र अमित शाह हे ‘लालबागचा राजा’ही गुजरातला पळवतील, असा हल्लाबोल उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले. त्यांनी महाराष्ट्र कमकुवत केला. अमित साह यांचं गृहखात्याकडं लक्ष नाही, त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. महाराष्ट्रातील जनता अमित शाह यांना शत्रू मानते. आता ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत. मात्र अमित शाह हे ‘लालबागचा राजा’ही गुजरातला पळवतील, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली.

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याबाबत संजय राऊत म्हणाले, “अमित शाहांना आमचा विरोध यासाठीच आहे की महाराष्ट्रात त्यांनी दळभद्री राजकराण करून महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. मुंबई, महाराष्ट्रातून ज्या पद्धतीने व्यापार, उद्योग, रोजगार आणि अनेक महत्त्वाचे आर्थिक केंद्र गुजरातला नेल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमित शाहांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. अमित शाह गृहमंत्री असले तरीही ते कमजोर गृहमंत्री आहेत.”

लालबागचा राजाही गुजरातला पळवतील
“लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येत आहेत. येऊद्या. मला तर सारखी भीती वाटते की ज्या प्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग पळवले, अनेक संस्था गुजरातमध्ये पळवल्या. त्याप्रमाणे ते लालबागचा राजा तर गुजरातला नेणार नाहीत ना.. ते काहीही करू शकतात. लालबागच्या राजाचं मोठं नाव आहे, देशभरातून लोक येत असतात. चला गुजरातला घेऊन जाऊयात, असं होऊ शकतं. लालबागचा राजाही गुजरातला नेण्याचा प्रस्ताव ठेवतील. व्यापारी लोक आहेत. मी तुम्हाला सांगतोय. मी फार विचारपूर्वक बोलतोय. हे लोक महाराष्ट्राला शत्रू मानत आहेत. भाजपाच्या अनेक लोकांना मुंबई लुटायची आहे”, असं संजय राऊत म्हणाले.  


Scroll to Top