Breaking News

जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही
जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही

Digital Kolhapur News Portal

दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवालआज आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत. त्याआधी त्यांनी आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ नेत्यांची बैठकीत घेतली. यावेळी बैठकी केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदासाठी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. यावेळी आमदारांनी केजरीवाल यांचा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला. आज संध्याकाळी अरविंद केजरीवाल एलजी यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देतील.

आतिशी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड
विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव मुख्यमंत्रीपदासाठी ठेवला होता. आमदारांनीही आतिशी यांच्या नावाचे स्वागत केले.

आतिशी या आठवड्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. आतिशी हे आम आदमी पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत.  ते अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे मानले जातात. मनीष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर आतिशी यांना शिक्षण मंत्रालयासह अनेक मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. ते कालकाजी, दिल्लीचे आमदार आहेत.

कोण आहेत आतिशी ?
आतिशी या आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि मंत्री आहेत. आतिशी यांनी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून राजकारण  सुरुवात केली. पुढे त्यांनी आम आदमी पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आतिशी सध्या दिल्लीच्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांनी दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळात शिक्षण विभागाबरोबर PWD, सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री म्हणून काम केले आहे. आतिशी या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जवळच्या मानल्या जातात. आतिशी यांनी २०१२ मध्ये भ्रष्टाचारविरोधी आंदोलनादरम्यान राजकारणात प्रवेश केला. तसेच आम आदमी पार्टीची उभारणी करणाऱ्या लोकांमध्ये त्यांचा समावेश होता.

Scroll to Top