Breaking News

जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही
जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही

Digital Kolhapur News Portal

कोल्हापूर :  शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह महायुतीच्या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची भेट घेतली. शहरातील नागरिकांना पाणी कनेक्शनसाठी प्रति मीटर ६५०० रुपये खुदाई खर्च म्हणून भरावे लागत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. हा खर्च कमी करण्याची मागणी माजी आमदार अमल महाडिक आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केली होती या मागणीला यश आलं आहे. 

दरम्यान, भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी हा खर्च १००० रुपये प्रति मीटर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पाणी कनेक्शन साठी येणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार आहे. शिवाय कोल्हापूर शहरातील कचऱ्याच्या समस्येवरही या बैठकीत चर्चा झाली. महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत असल्यास शासनाकडे यंत्रसामग्री आणि मनुष्यबळासाठी निधीची मागणी करावी. आपण शासन स्तरावर पाठपुरावा करून ही मागणी मंजूर करून आणू अशी ग्वाही माजी आमदार अमल महाडिक यांनी दिली. 

त्याचबरोबर टेंबलाईवाडी येथील क्षेत्र क्रीडांगणासाठी आरक्षित करणे, टाकाळा येथील आशा कॉलनी झोपडपट्टी नियमित करणे, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या महापालिका प्रभागांमध्ये ड्रेनेज व गॅस पाईपलाईनची कामे सुरू करणे, सुभाष नगर येथील सरकारी शौचालय पाडणे, सुभाष नगर को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे हॉल बांधण्यासाठी ना हरकत पत्र देणे, कोल्हापूर शहरातील सिग्नल व्यवस्थेबाबत शहर वाहतूक शाखेसोबत समन्वय राखणे, राजेंद्र नगर, यादव नगर मधील झोपडपट्टी धारकांना त्यांच्या वापरातील जागा मालकी हक्काने देणे, जवाहर नगर बिजली चौक परिसरातील रहिवाशांचे प्रॉपर्टी कार्ड बनवणे, उपनगरांमधील नवीन क्रीडांगण प्रस्तावांबाबत उपसमितीची बैठक घेणे, हॉकी स्टेडियम मधील प्रलंबित कामे पूर्ण करणे, शिंगणापूर बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे, राजेंद्र नगर येथे अमृत योजनेसाठी वीज कनेक्शन उपलब्ध करून देणे अशा विविध विषयांवर आयुक्तांसोबत चर्चा झाली. 

दरम्यान, सर्व विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी महाडिक यांनी आयुक्तांना दिल्या. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, प्रा.जयंत पाटील, आशिष ढवळे,आप्पा लाड यांच्यासह महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Scroll to Top