कोल्हापूर : लोकराजा उर्जा मैत्री परिवाराच्या वतीने काव्यांगण २०२४ या निमंत्रितांचे कवी संमेलन शनिवारी (दि. ०५ ऑक्टोबर) रोजी आयोजित केलं आहे. शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषाभवन सभागृहात सायंकाळी ४.30 वा. निमंत्रित कवींची मैफिल रंगणार आहे. तर कवि संमेलनासाठी मोफत प्रवेश असणार आहे.
दरम्यान, लोकराजा उर्जा मैत्री परिवाराच्या वतीनं सलग तीन वर्षे या काव्यसंमेलानाचं आयोजन केलं जात आहेत. या कवी संमेलनासाठी महाराष्ट्रातील नामवंत कवींना निमंत्रित केलं जातं. यावर्षीही नामवंत कवींना या काव्यासंमेलानासाठी निमंत्रित केलं आहे. यामध्ये प्रेमाचा जांगडगुत्ता कवितेने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडलेले नारायण पुरी, युवा कवी उमेश सुतार, युवा कीर्तनकार आणि कवी अविनाश भारती, कवी रोहित शिंगे, कवयत्री यामिनी दळवी, कवी नितीन जाधव आणि युवा गझलकार विश्वास पाटील यांचा समावेश आहे.
मुख्य प्रायोजक म्हणून एम. एम. ग्रुपचे हॉटेल नैव्यद्यम, आम्ही समोसेकर, यश टूर्स अॅंड ट्रॅव्हल्स, प्रयोदी सोशाल अॅंड कल्चरल फाऊंडेशन तर सहप्रायोजक म्हणून अरुण नरके फाऊंडेशन, पैलवान थंडीई हाऊस, लोकराजा क्लासेस, अश्वमेध टूर्स अॅंड ट्रॅव्हल्स, डिजिटल कोल्हापूर, युनिक इन्स्टिट्यूट तसेच विशेष सहकार्य म्हणून युवा व्याख्याते आणि उद्योजक विजय चौगुले, प्रसिद्ध वक्ते युवराज पाटील, अश्वमेध टूर्स अॅंड ट्रॅव्हल्सचे संदीप यादव, सामाजिक कार्यकर्ते किरणकुमार साळोखे, मेतीबाग तालीम मंडळ, कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले आहे.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे हे असणार आहेत. तर कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवयित्री, अनुवादिका डॉ. माया पंडित, प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे. त्याचबरोबर हॉटेल नैवेद्यम चे मारुती माने आम्ही समोसेकरचे विजय आवळेकर, इचलकरंजी विभागाचे पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, मिरज विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे स्वीय सचिव सुधीर भातमारे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते सचिन सूर्यवंशी, प्रयोदी सोशल अँड कल्चरल फाउंडेशन कोल्हापूरचे प्रवीण कोडोलेकर, यश टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुणेचे प्रमोद कसबले, मुक्तबंध विचार मंचचे अध्यक्ष सुनील कांबळे, हॉटेल पानारी रेस्टॉरंट अँड लॉजिंग चे सतीश पानारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.