Breaking News

जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही
जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही

Digital Kolhapur News Portal

 इंदापूर : गेल्या काही आठवड्यांपासून हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालाय. हर्षवर्धन पाटील यांनी आज कार्यकर्त्यांच मेळावा घेत आपला निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना विचारात घेऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.  तर हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “हर्षवर्धन पाटील यांचं आमच्या पक्षांमध्ये स्वागत करतो. राष्ट्रवादी प्रवेशाचे अशा पध्दतीचे  असे अनेक धक्के येत्या काही काळात दिसून येतील. राष्ट्रवादीची विचारधारा ते मांडत असतील ते केव्हाही पक्षात येऊ शकतात, त्याचे स्वागत होईल”, असं मतंही शरद पवारांनी व्यक्त केलं. 

कार्यकर्त्यांचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष यात जावं होता. त्यामुळे मी आणि आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष यात जाण्याचा निर्णय जाहीर केला. हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही. मी भाजपाचे जे प्रमुख नेते आहेत, त्यांच्यासोबत ५ वर्ष काम केले. त्यात रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील तसेच इतर सहकाऱ्यांशीही चर्चा केली. त्या सगळ्यांनाही माझ्या निर्णयाची कल्पना दिली आहे. इंदापूर तालुक्यात लोकांची भूमिका महत्त्वाची आहे. गेली १० वर्ष या तालुक्यात जी माणसं आमच्यामागे ठामपणे उभी राहिली त्यांच्यावर खूप अन्याय झाला. त्यामुळे हा जनतेचा उद्रेक याठिकाणी निर्माण झाला आहे असा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला. 

राजकारणात कोण कोणाचं शत्रू नसतो. प्रत्येकाचे व्यक्तिगत संबंध असतात. आज मी हा निर्णय घेतला म्हणून इतरांशी संबंध दुरावले असं होत नाही. महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. संस्कृती जपण्याचे काम करतोय. भाजपा तालुकाध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष, माझ्यासहित भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम्ही सर्वजण राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करतो. आपल्याला कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही, आपल्याला भविष्यातील विजय मिळवायचा आहे. सगळ्या गोष्टी संयमाने घ्या, आपण ६० वर्ष विजयही बघितला आहे, १० वर्षाचा पराजयही बघितला आहे. पवार कुटुंबाचे आणि आपले व्यक्तिगत संबंध आहेत. गेल्या ६ दशकापासून संबंध आहे. राजकारणात वेगळे निर्णय झाले असतील परंतु व्यक्तिगत संबंधात कधीही टोकाची भूमिका घेतली नाही. कुणालाही काही बोलू नका, जे व्हायचं ते व्यवस्थित होईल. मागील १० वर्षात जो त्रास झाला आहे तो दुरुस्त करायचा असेल तर इथला प्रत्येकजण उद्याच्या परिवर्तनाचा महत्त्वाचा घटक आहे असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं. 

Scroll to Top