कोल्हापूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शिवाजी महाराज पुतळा अनावरण आणि संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार लावणार होते. दरम्यान, राहुल गांधी केलेल्या अमेरिकेतील वक्तव्याचा निषेध करत त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र, राहुल गांधी येण्यापूर्वीच पोलिसांनी भाजप कार्यालयातच कार्यकर्त्यांना घेरले. तेथे भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.
दरम्यान, भाजपच्या कार्यकर्ते गेट तोडून आंदोलन करण्यासाठी मुख्य रस्त्याकडे धावले. मात्र, पोलिसांनी पोलिसांना अडवल्याने भाजप कार्यकर्त्यांचा रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यावर भाजप कार्यकर्ते ठाम आहेत.भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
राहुल गांधी आपल्या कोल्हापूर दौऱ्यात कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर ते राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळाला भेट देणार आहेत. तसेच दुपारी संविधान सन्मान संमेलनाला देखील ते उपस्थित राहणार आहेत.