Breaking News

जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही
जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही

Digital Kolhapur News Portal

चंदगड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघांमध्ये चार दिवसांपूर्वी पार पडल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये होती. गडहिंग्लज तालुक्यातील नेसरीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीतीमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांनी अप्रत्यक्ष अजित पवारांवर टीका केली. 

यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवर आणि पेहरावावर टीका केली. गुलाबी यात्रा पुढं गेली की मागून गळती लागते. गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही. ईडी आणि सीबीआयला घाबरून अनेकांनी भूमिका बदलल्या. महाराष्ट्र कधी विकला जात नाही, झुकत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे. इतकंच नाही तर दिल्लीच्या बापासमोर झुकत नाही हे लोकसभेला महाराष्ट्राने दाखवून दिले असल्याचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

यावेळी अमोल कोल्हे म्हणाले, ‘वेढ्यात मराठी वीर दौडले सात हेच याच भूमीत घडलं होतं. स्वामी निष्ठा काय असते हे याच मातीने दाखवले आहे. त्याच मातीत दोघांनी गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली त्यांना स्वाभिमानी जनता जागा दाखवेल.’ तर बारामतीच्या सेनापतीने सांगितलं की निवडणूक लढवायची की नाही हे कळेना झाले आहे. आता सेनापती असे म्हणत असतील तर इतर काय म्हणत असतील याचा विचार करा. आम्ही 60 ते 62 विधानसभा मतदारसंघात तुतारीचा आवाज येतोय. लक्षात ठेवा आज वेळ तुमची असेल तर येणारा काळ आमचाच आहे, असा इशारा अमोल कोल्हे यांनी दिला आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघात हत्तीचा त्रास खूप आहे, पण सरकार त्याला काही मदत करत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांनी महाविकास आघाडी सरकारच्या उमेदवाराला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Scroll to Top