सांगरूळ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापायला लागलं आहे. यातच करवीर मतदारसंघात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. काही दिवसापूर्वी धामणी खोऱ्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. रविवारीही यशवंत बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक एकनाथ पाटील, यांच्यासह आर. बी. खत कारखान्याचे माजी चेअरमन आनंदराव पाटील, कुडित्रे गावचे माजी सरपंच युवराज उर्फ पाटील, यशवंत बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील, यांच्यासह कुंभी-कासारी परिसरातील काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेचे मफलर घालून त्यांचे स्वागत केले.
शनिवारी (दि. 6) अर्चना मल्टिपर्पज हॉल, वाकरे फाटा येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना नरके यांनी, माझ्या नेतृत्वावर विश्वास दाखवत काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. गेली पाच वर्ष आमदारकी पासून दूर असताना देखील जो निधी मी मतदार संघात आणला. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी पुढे नरके म्हणाले, विकासाची ही वारी अखंड सुरू ठेवू, पक्षप्रवेश केलेल्या सर्वांना आपल्या गटामध्ये, शिवसेना पक्षामध्ये कधीही दूजा-भाव जाणवणार नाही. आपण सगळे आता माझं कुटुंब आहात. आपल्या सुख-दुःखात मी सदैव सोबत असेन. यापुढे एकदिलाने आपण काम करू, असे सर्व कार्यकर्त्यांना मी आश्वासन देतो.
तर आमदार नसताना लोकांशी कधी संपर्क तुटू दिला नाही, या गोष्टीवर प्रभावित होऊन आम्ही सगळे पक्षप्रवेश करत असल्याच्या भावना, यावेळी यशवंत सहकारी बँकेचे माजी चेअरमन एकनाथ पाटील यांनी व्यक्त केल्या.
यावेळी, एकनाथ पाटील कुडीत्रे (मा.चेअरमन यशवंत बँक), आनंदराव लहू पाटील (मा.चेअरमन आर. बी. पाटील खत कारखाना), युवराज उर्फ बाळ पाटील (मा. सरपंच कुडीत्रे) पांडुरंग पाटील (माजगावकर) कुडीत्रे, महादेव माळी (कुडीत्रे), सर्जेराव पाटील कोपार्डे (मा.संचालक यशवंत बँक) आनंदराव कोपार्डेकर (सांगरूळ), संभाजी नंदिवाले (कोपार्डे), उत्तम पाटील (साबळेवाडी), शशिकांत पाटील (क|| ठाणे), दिनकर चौगुले (सरपंच हरपवडे), अशोक चौगुले (हरपवडे), संग्राम भापकर (मा.संचालक यशवंत बँक) सुरेश रांगोळकर (मा. संचालक यशवंत बँक), सुधाकर देसाई (भामटे) यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेत प्रवेश करून घेतला.