मुंबई : महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीचा निकाल शनिवारी (23 नोव्हेंबर) जाहीर झाला. त्याचवेळी झारखंडमध्ये झालेल्या विधानसभेचा निकालही जाहीर झाला. महाराष्ट्रात महायुतीने दणदणीत विजय संपादन केला. तर झारखंडमध्ये मात्र इंडिया आघाडीने बाजी मारली. मात्र महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर विरोधकांना संशय आहे. त्यातच आता एकूण 95 मतदारसंघांमध्ये मतदान आणि मतमोजणी यामध्ये तफावत आल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 19 मतदारसंघांमध्ये ईव्हीएममध्ये जास्त मतांची नोंद झाल्याचे आढळले. तर, 76 मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या तुलनेत ईव्हीएममध्ये कमी मतांची नोंद झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून ईव्हीएममध्ये फेरफार करून निवडणूक जिंकल्याचे आरोप होताना दिसत आहेत. त्यामुळं ईव्हीएमवरून पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी मागील सुमारे 30 वर्षातील विक्रमी मतदान झाले होते. राज्यात सर्वांधिक 66.05 टक्के मतदान झाले होते. मागील पाच वर्षाच्या तुलनेत राज्याच्या मतदान टक्केवारीत सुमारे 5 टक्के वाढ झाली होती. त्यामुळे जनतेचा कौल कोणाला मिळतो याबाबत उत्सुकता होती. त्यानुसार मतदारांनी महायुतीला भरभरून मते दिल्याने महायुतीने 230 जागा जिंकल्या. तर, महाविकास आघाडी केवळ 46 जागांवर मर्यादित राहिली. हा निकाल अविश्वसनीय असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे. त्यातच आता ईव्हीएमबद्दलचा संशय निर्माण करणारी आकडेवारीही समोर आली आहे. वेगवेगळ्या मतदार संघातील व्हिडीओही समोर येत आहेत. त्यामुळं या मतदान आणि निकाल प्रक्रियेवर संशय निर्माण केला जात आहे.
ददरम्यान, राज्यात एकूण 288 पैकी 193 मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणीचा आकडा जुळला आहे. मात्र, उर्वरित 95 मतदारसंघ असे आहेत की, मतदान आणि मतमोजणीत तफावत आढळली आहे. त्यापैकी 19 मतदारसंघांमध्ये ईव्हीएममध्ये जास्त मतांची नोंद झाल्याचे आढळले. तर, 76 मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या तुलनेत ईव्हीएममध्ये कमी मतांची नोंद झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता विरोधक आक्रमक झालेत. परिणामी ईव्हीएमवरून पुन्हा एकदा वादंग निर्माण होऊ शकतो.
राज्यातील या मतदारसंघ्तील आकडेवारी संशयास्पद
कागल, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, करमाळा, सोलापूर दक्षिण, आमगाव, उमरखेड, लोहा, औरंगाबाद पूर्व, भोसरी, परळी, देगलूर, हिंगोली, वैजापूर, कळवण, चांदवड, दिंडोरी, बोईसर, आणि मालेगाव मध्य या 19 मतदारसंघांमध्ये मतदानाच्या तुलनेते जास्त मते आढळली.
या 76 मतदारसंघंमध्ये आढळली एकूण मतदानाच्या तुलनेत कमी मते
तर, इंदापूर, अकोला पश्चिम, सिन्नर, बारामती, निफाड, मावळ, मोर्शी, नालासोपारा, कोथरूड, वर्धा, वसई, खडकवासला, सावनेर, भिवंडी पश्चिम, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, पुणे कॅन्टोन्मेंट, कोपरगाव, शेवगाव, अक्कलकुवा, गंगाखेड, विलेपार्ले, नवापूर, पाथरी, चांदिवली, साक्री, घनसावंगी, शिरपूर, बदनापूर, सायन कोळीवाडा, चोपडा, औरंगाबाद पश्चिम, मुंबादेवी, भुसावळ, पनवेल, जळगाव शहर, गाणगापूर, कर्जत, चाळीसगाव, नांदगाव, अलिबाग, पाचोरा, मालेगाव बाह्य, आंबेगाव, जामनेर, शिरूर, अकोट, बागलाण, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, औसा, तुळजापूर, माढा, कामठी, आरमोरी, अहेरी, ओवळा माजीवाडा, नांदेड दक्षिण, मुखेड, बल्लारपूर, चिमूर, मीरा भाईंदर, वणी, कोपरी पाचपाखाडी, कळमनुरी, दिंडोशी, जिंतूर, चारकोप, खानापूर, कोल्हापूर उत्तर, सोलापूर शहर मध्य आ 76 मतदारसंघंमध्ये एकूण मतदानाच्या तुलनेत कमी मते आढळली.