Breaking News

जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही
जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही

Digital Kolhapur News Portal

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ट्रम्पेट या चिन्हामुळे मोठा फटका बसला होता. कारण शरद पवार पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे होतं. मात्र ट्रम्पेट आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन्ही चिन्हात साधर्म्य असल्याने काही मतदारांनी ट्रम्पेटला पसंती दिली होती.  दरम्यान,  तुतारी आणि पिपाणी चिन्हांमुळे लोकसभेला मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवार गटाने  निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र निवडणूक आयोगाने चिन्ह रद्द करण्यास नकार दिला होता. मात्र निवडणूक आयोगाने ‘ट्रम्पेट’ चिन्हाचे ‘तुतारी’ हे मराठी भाषांतर रद्द करण्याचा निर्णय घेत शरद पवार गटाला दिलासा दिला होता. तरीही  या विधानसभा निवडणुकीत  ट्रम्पेट या निवडणूक चिन्हामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जवळपास 9 जागांवर फटका बसला आहे. 

विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस असे होते. याच निवडणुकीत अनेक जागांवर तुतारी (ट्रम्पेट) असे चिन्ह असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तुतारी या नावामुळे अनेक जागांवर शरद पवार यांच्या पक्षाला फटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्तक केला जात होता. त्याची प्रचीती आता आली आहे. शरद पवार यांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ जागांवर फटका बसला आहे. तुतारीला मिळणारी मतं जर शरद पवार यांच्या पक्षाला मिळाली असती तर या नऊ जागांवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार विजयी झाले असते, असे बोलले जात आहे. 

कोणकोणत्या जागांवर फटका बसला? 
जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज, परंडा या जागांवर शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा जेवढ्या मतांनी पराभव झाला आहे, त्यापेक्षा अधिक मतं तुतारी हे निवडणूक चिन्ह असलेल्या उमेदवारा मिळाली आहेत. 

या मतदार संघात पिपाणीने केला तुतारीचा पराभव 
 जालना जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षाचे विजय भांबळे यांचा पराभव झाला. या मतदारसंघात त्यांचा 4516 मते कमी पडली. तर तुतारी म्हणजेच ट्रम्पेटला 7430 मतं मिळाली. घनसावंगीमध्ये राजेश टोपे यांचा 2309 मतांनी पराभव झाला. येथे ट्रम्पेट या चिन्हाला 4830 मते मिळाली. शहापूर येथे शरद पवार यांच्या पक्षाचे पांडुरंग बरोरा यांचा 1672 मतांनी पराभव झाला. येथे ट्रम्पेटला 3892 मते मिळाली. बेलापूरमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे संदीप नाईख यांचा अवघ्या 377 मतांनी पराभव झाला. तर येथे ट्रम्पेटला 2860 मते मिळाली. अणुशक्तीनगर येथे  फहाद अहमद यांचा 3378 मतांनी पराभव झाला. तर येथे तुतारीला एकूण 4075 मते मिळाली.

आंबेगाव या जागेवर शरद पवार यांच्या पक्षाचे देवदत्त निकम यांचा 1523 मतांनी पराभव झाला. येथे तुतारी म्हणजेच ट्रम्पेट या निवडणूक चिन्ह असलेल्या उमेदवाराल 2965 मते मिळाली. पारनेर या जागेवर शरद पवार यांच्या पक्षाच्या राणी लंके यांचा 1526 मतांनी पराभव झाला. येथे ट्रम्पेटला 3582 मते मिळाली.  केज या मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचे पृथ्वीराज साठे यांचा 2687 मतांनी पराभव झाला. दुसरीकडे याच मतदारसंघात ट्रम्पेटला 3559 मते मिळाली. परंडा या जागेवर राहुल मोटे यांचा 1509 मतांनी पराभव झाला. दुसरीकडे याच मतदारसंघात ट्रम्पेटला 4446 मते मिळाली. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतही सातारा तसेच इतर लोकसभा मतदारसंघात ट्रम्पेट या निवडणूक चिन्हामुळे शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्याचीच प्रचिती आता यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही आली. पिपाणीमुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना मिळणाऱ्या एकूम मतांच्या टक्केवारीवर याचा परिणाम झाला आहे.

Scroll to Top