Breaking News

जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही

Digital Kolhapur News Portal

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून देशभरात महिला सुरक्षेवरुन वातावरण तापलं आहे. याला कोलकात्यामध्ये डॉक्टर महिलेची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. यानंतर बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यावरुन स्थानिकांनी रेल रोकोकरत आपला रोष व्यक्त केला होता. यानंतर आता कोल्हापुरात दहा वर्षीय चिमुरड्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची धकादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिये रामनगर येथील 10 वर्षीय परप्रांतीय मुलगी बुधवार दुपारपासून घरातून गायब झाली होती. यानंतर तिच्या नातेवाईकांनी शिरोली पोलिसात तक्रार दिली होती. शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी व स्थानिक नागरिकांनी शिये रामनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, विहिरी, ओढे, उसाच्या शेतात तपास केला. पण कोणताच सुगावा हाती लागला नव्हता. आज या मुलीचा मृतदेह आढळला आहे.

लाडकी बहीण कार्यक्रम वचनपूर्ती सोहळा सुरु असतानाच प्रकार उघड

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कोल्हापुरात दहा वर्षीय चिमुरड्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची धकादायक उघडकीस आली आहे. कोल्हापुर शहरालगतच असलेल्या या शहरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे महायुतीचा आज लाडकी बहीण कार्यक्रम वचनपूर्ती सोहळा कोल्हापूरमध्ये सुरू असतानाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राज्यातील मुली आता सुरक्षित आहेत की नाहीत? हा पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Scroll to Top