Breaking News

जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही
जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही

Digital Kolhapur News Portal

बेंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना उच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे. सिद्धरामय्या यांच्यावर म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) द्वारा करण्यात आलेल्या जमीन अधिग्रहण प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप आहेत. या प्रकरणाची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. 

कथित म्हैसुरु शहरी विकास प्राधिकरण  (MUDA) जमीन घोटाळा प्रकरणात त्यांच्या विरोधात खटला चालवण्यास राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी परवानगी दिली होती. राज्यपालांच्या या निर्णयाला सिद्धरामय्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने दोन्हीकडील बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची याचिका मंगळवारी (२४ सप्टेंबर) कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे MUDA प्रकरण?
उच्च न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी 12 सप्टेंबर रोजी पूर्ण केली होती. त्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. आज (मंगळवार, 24 सप्टेंबर) रोजी न्या. एम. नागप्रसन्ना यांच्या एक सदस्यीय खंडपीठानं या विषयावर निर्णय सुनावला. ‘राज्यपाल स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. गहलोत यांच्या निर्णयात कोणतीही चूक नाही,’ असं न्या. नागप्रसन्ना यांनी स्पष्ट केलं. 

सिद्धरामय्या यांनी 19 ऑगस्ट रोजी राज्यपालांच्या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्यपालांनी कोणताही विचार न करता या आदेशाला मान्यता दिली आहे. हे घटनात्मक नियमांचं उल्लंघन आहे, असा दावा सिद्धरामय्या यांनी केला होता.  सिद्धरामय्या यांच्यावर त्याच्या पत्नीला म्हैसुरू शहरी विकास प्राधिकरणाच्या (MUDA)  14 भूखंडांचं वाटप करताना अनियमितता केल्याचा आरोप आहे. सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांच्या मालकीच्या 4 एकर जमिनीचं अधिग्रहण करण्याच्या बदल्यात पॉश भागात वैकल्पित जमिनीचं वाटप करण्यात आलं, असा आरोप कर्नाटक भाजपानं केला आहे. 

सिद्धरामय्या यांनी माझं आयुष्य हे एक उघडं पुस्तक असल्याचं सांगत हे सर्व आरोप फेटाळले होते. भाजपा सरकारनं सुुरु केलेली 50:50 अनुपात’ योजनेनुसार माझ्या पत्नीला वैकल्पिक जमीन मिळणं आवश्यक होतं, असा दावा त्यांनी केला होता. 

 
Scroll to Top