Breaking News

जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही
जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही

Digital Kolhapur News Portal

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अनेक आठवड्यांपासून अवकाशात अडकले आहेत. मात्र अंतराळात सुनीता विल्यम्सला सर्वात मोठा धोका कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का ?नासाची भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचे साथीदार बुच विल्मोर हे गेल्या एका महिन्याहून अधिक काळापासून अंतराळात अडकले आहेत. हे दोघेही बोइंग स्टारलायनर कॅप्सूलद्वारे अंतराळात गेले होते, परंतु अंतराळ यानामध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे ते अद्याप पृथ्वीवर परत येऊ शकले नाहीत. सुनीता विल्यम्स आणि तिचे साथीदार पृथ्वीवर यशस्वीपणे परत कधी येऊ शकतील आणि त्यांना सर्वात जास्त धोका असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत ? असा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे.

5 जून रोजी फ्लोरिडा येथून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे अंतराळात रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे मिशन देखील केवळ 7 दिवसांचे होते, परंतु त्यांना आता तेथे जाऊन एक महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंतराळवीर सुनीता विल्यम्स विल्मोरसोबत यांच्या यशस्वी परतीसाठी नासा सतत प्रयत्न करत आहे. बोइंग स्टारलायनरचे हे पहिले उड्डाण होते. हेलियम गळती आणि थ्रस्टर खराब झाल्यामुळे परतीचे मिशन पुढे ढकलण्यात आल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. सुनीता सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहे. पण त्या पूर्णपणे सुरक्षइत आहेत, असे नाही. अंतराळात त्यांना कोणत्या गोष्टींचा धोका आहे, ते जाणून घेऊया.
सुनीता आणि विल्मोर हे दोघे 7 दिवसांच्या मिशनवर गेले. मात्र तांत्रिक बिघाडामुळे परिस्थिती बदलली असून ते आता 40 दिवसांपेक्षा जास्त काळ अंतराळातच आहेत. अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण, रेडिएशनचा धोका, अवकाश स्थानकांचे मर्यादित भाग ही त्यांच्यासमोरची मोठी आव्हाने आहेत. इतकंच नाही तर अंतराळ स्थानकावर जास्त वेळ राहिल्याने मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तेथे गुरुत्वाकर्षण नसल्याने शरीरातील द्रव पदार्थ शरीराच्या वरच्या भागात पोहोचू लागतात, ज्यामुळे चेहऱ्यावर सूज येणे, नाक बंद होणे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रक्ताचे प्रमाण कमी होऊन रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.

Scroll to Top