Breaking News

जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही
जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही

Digital Kolhapur News Portal

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. राज्यातील 288 जागांपैकी 235 जागांवर महायुतीने विजय संपादन केला आहे. निकालानंतर आता हालचाली सुरु आहेत त्या सत्ता स्थापनेच्या. मुख्यमंत्री कोण होणार ? याकडे सर्वांच्या नजरा आहेत. तर  दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुकीच्या  विजयाचा गुलाल अजूनही उधळला जात आहे. यातच आता महायुतीने एक निर्णय घेत राज्यात पुन्हा एकदा प्रचाराचा धुरळा उडणार आहे. राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या प्रलंबित निवडणुका घेण्याबाबत महायुतीने निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि इतर घटक पक्षांचा समावेश असलेल्या महायुतीने एकतर्फी विजय संपादन केला आहे. राज्यातील 288 जागांपैकी 235 जागांवर महायुतीला मोठं यश मिळाले. त्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत महायुतीत चर्चा होत असताना दुसरीकडे महायुतीने महत्त्वाचा निर्णय घेतला, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये राज्यात प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या निवडणूका घेण्याबाबत महायुती हालचाल करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.   

राज्यात छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, ठाणे, पुणे, नागपूर, मुंबईसह इतर काही महत्त्वांच्या महापालिकांच्या निवडणुका मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. ओबीसी आरक्षण, वॉर्ड रचना अशा वेगवेगळ्या वादांमुळे महापालिकाच्या निवडणुका प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींच्या कचाट्यात अडकले आहेत. आता, यावर तोडगा काढून निवडणुका घेण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. दोन दिवसात सत्ता स्थापन होऊल. त्यांनतर आता येत्या 3 महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीत याबाबत एकमत झाले आहे. विधानसभा निवडणूक निकालाचे वारे असे पर्यंत निवडणुका घेण्याचा महायुतीने  एकमताने निर्णय घेतला आहे. दरम्यान, सरकार स्थापन होताच पहिल्या कॅबिनेट बैठकीत महापालिका निवडणूकांची अधिसूचना जारी केली जाणार आहे. त्यामुळे राज्यात 2-3  महिन्यांत पुन्हा एकदा निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे. महापालिका निवडणुकांसोबत जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.


Scroll to Top