नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ‘एक देश एक निवडणूक’ हा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये मंजूर झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारीच याबबात विधान केलं होतं. बुधवारी हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे हा कायदा कधीपासून लागू होईल, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
यापूर्वी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश – एक निवडणुकीचे सुतोवाच केले होते. सातत्याने होणाऱ्या निवडणुकांममुळे देशाच्या प्रगतीला खीळ बसते , असेही मोदी यांनी म्हटले होते. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने एक देश – एक निवडणूक आश्वासन दिले होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीने पहिले पाऊल म्हणून लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकत्रित घेण्याची शिफारस केली होती. यावर आज बैठक पार पडली असून केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये मंजूर झाला आहे.
जनगणनेची घोषणा लवकरच..!
देशात जनगणना करण्याबाबतची घोषणा सरकार लवकरच करील,असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी येथे सांगितले. कोविड-१९ मुळे जनगणनेला अगोदरच विलंब झाला आहे, त्यामुळे आता जनगणनेबाबतची घोषणा लवकरच केली जाईल, असे शहा म्हणाले. जेव्हा जणगणनेची घोषणा केली जाईल त्यावेळी आम्ही सविस्तर तपशील जाहीर करू, असे शहा यांनी जातनिहाय जनगणनेबाबत विचारलेल्या प्रश्नला उत्तर देताना सांगितले.