Breaking News

जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही
जरांगे-पाटील पूर्ण राजकीय झालेत, त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी; प्रविण दरेकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पुण्यात भाजपचे चिंतन अन् मंथन दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ उद्योगात राज्याचं लौकिक वाढवू, शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये ग्वाही

Digital Kolhapur News Portal

कोल्हापूर : लोकसभेला अनेक धक्कादायक निकाल लागले. त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे हातकणंगले. शिवसेना शिंदे गटाकडून धैर्यशील माने तर शिवसेना ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील-सरूडकर यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. यामध्ये सत्यजित पाटील बाजी मारणार असे चित्र असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात तळ ठोकत सूत्रं हलवली आणि विजय खेचून आणला. यानंतर आता मात्र विधानसभेचे वेध लागले असून राजकीय हालचालींना वेग आलाय. कोणाला कोठून निवडणुकीसाठी उभं करायचं याची चाचपणी सुरु आहे. मात्र जागावाटपावरून दोन्ही आघाडी तर स्सीखेच सुरु आहे.

कोल्हापुरातील राजकीय स्थितीत पाहता काही दिवसापासून जिल्ह्यात महायुतीला एकामागून एक धक्के बसायला सुरुवात झालीय. यातच आता महायुती महाविकास आघाडीलाही हातकणंगले मतदार संघात धक्का देण्याच्या तयारीत आहे. हातकणंगले हा मुळचा शिवसेनेचा मतदारसंघ. महायुतीमध्ये हा मतदार संघ शिवसेनेला जाणार की जनसुराज्यला जाणार याच उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे.

हातकणंगले विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. कॉंग्रेसचे राजूबाबा आवळे हे हातकणंगले विधानसभेचे आमदार आहेत. त्या आधी सुजित मिणचेकर हे २००९ आणि २०१४ मध्ये सलग १० वर्षे हातकणंगले मतदार संघातून आमदार राहिलेत. तर २०१९ च्या निवडणूकीत त्यांना निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं तरी त्यांनी  66,950 इतकी मत घेतली आहेत. त्यामुळं मिणचेकर यांना कोणत्या ही पक्षाला  दुर्लक्षित करता येणार नाही. गत पाच वर्षातील मिणचेकरांचा मतदारसंघातील जनसंपर्क, सध्य़ा जिल्हा दुध संघ म्हणजेच गोकुळमध्ये ते संचालक म्हणून कार्यरत असून या माध्यमातून शेतकरी वर्गाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. 

सध्याची हातकणंगेची राजकीय स्थिती पाहता माजी आमदार सुजित मिणचेकर हे शिवसेना उबाठा गटाकडून चाचपणी करत आहेत. मात्र महाविकास आघाडीमध्ये ही जागा नेमकी कोणाला जाणार हे अद्याप स्पष्ट नाही, यावर विद्यमान आमदारांना  संधी पुन्हा मिळाल्यास माजी आमदार सुजित मिणचेकर काय निर्णय घेणार यावर बऱ्याच घडामोडी अवलंबून आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते या मतदारसंघासाठी नेमका काय निर्णय घेतात ? याकडे आता सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

Scroll to Top