कोल्हापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि प्रदीर्घ संघर्षानंतर कोल्हापूरकरांसाठी वंदे भारतची मागणी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत 16 सप्टेंबरपासून धावणार आहे. त्याआधी वंदे भारत एक्स्प्रेसची आज चाचणी फेरी होणार आहे. नव्या अलिशान आणि गतिमान रेल्वेमुळे कोल्हापूर ते पुणे प्रवाश कमी वेळेत होणार आहे. ताशी ८० ते १०० किमी वेगाने धावणार आहे. त्यामुळे चाचणी काळात कोल्हापूर ते पुणे मार्गावर रेल्वे रुळावर आणि आसपास कोणी येऊ नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
सोमवारी सकाळी 11 वाजता कोल्हापुरातून रेल्वे राज्यमंत्री यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. यावेळी खासदार शाहू छत्रपती, धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने उपस्थित असतील.
असे असेल वेळापत्रक?
कोल्हापूर ते पुणे वंदे भारत प्रत्येक मंगळवार, शनिवार व सोमवारी धावणार
पुणे ते कोल्हापूर वंदे भारत प्रत्येक बुधवार, शुक्रवार व रविवारी धावणार
अशी धावणार कोल्हापूर-पुणे वंदे भारत
कोल्हापूर ते पुणे वंदे भारत सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापुरातून निघेल.
मिरजमध्ये 9 वाजता, सांगलीत सव्वा नऊ वाजता, किर्लोस्करवाडीत 9.42 मिनिटांनी कराडला 10.07, सातारा 10.47 आणि पुण्यात दीड वाजता पोहोचेल.
पुण्यातून परतणारी गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल. साताऱ्यात 4.37 कराड 5.25, किर्लोस्करवाडीत 5.50, सांगली 6.18, मिरजेत 6.40 तर कोल्हापुरात 7.40 ला पोहोचेल.
हुबळी ते पुणे वंदे भारत कशी असेल?
हुबळी ते पुणे वंदे भारत बुधवार, शुक्रवार व रविवारी पहाटे 5 वाजता सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल
पुणे ते हुबळी गुरुवार, शनिवार व सोमवारी दुपारी सव्वा दोनला सुटेल रात्री 10.45 वाजता हुबळीत पोहोचेल.
या गाडीला धारवाड , बेळगाव, मिरज ,सांगली, सातारा असे पाच थांबे आहेत.