इरादा पत्र मंजूर ! बिद्रीच्या शेतकऱ्यांचा १३५ कोटींचा इरादा पक्का !

कारखान्याच्या डिस्टलेरी प्रकल्पाला तातडीने बुधवारी इरादा पत्र मंजूर झाले आणि के.पी पाटील यांनी अजित पवार गटाकडे जाण्याचा घेतलेला निर्णय हा महत्त्वाचा ठरला. 135 कोटी रुपयांचा डिस्टलरी  प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी  बदलत्या राजकीय समीकरणा नुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या काही दिवसातच इरादा पत्राला मंजुरी मिळाली 

astigma hope clinic kolhapur

हा प्रकल्प उभा करत असताना कारखाना पूर्ण तोट्यात जाणार अशी त्यांच्यावर टीका झाली इथेनॉल मध्यार्क निर्मितीचा 135 कोटी रुपयांचा प्रकल्प उभा करण्याचे काम सुरू झाले मात्र या प्रकल्पासाठी लागणाऱ्या  इरादा पत्राला आमदार आबिटकर यांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला.  तेव्हा सहकारातील अशा गोष्टीला विरोध करण्याची घाणेरडी  प्रवृत्ती कोल्हापुरात आहे  अशी टीका अजित पवार यांनी भर सभेत केली होती तेव्हा आमदार आबिटकर यांनी इरादापत्र अडवल्याचं सिद्ध झालं होतं मात्र राजकीय आणि राज्यस्तरीवरच्या घडामोडीनंतर अखेर के पी पाटील यांनी बिद्री कारखान्यासाठी इरादा पत्र मंजूर करून आणले यामुळे बिद्री कारखाना हा अजून आर्थिक सक्षम होणार आहे तसेच भविष्यात ऊस दराचा विक्रम मोडेल असे बोले जात आहे