बिद्री निवडणूकीत 3 माजी आमदारांसह मोरे घराण्याचे के.पी.ना भक्कम पाठबळ

दाटे ग्रामपंचायतीत २०१० ते २०२० कालावधीत लाखोंचा भ्रष्टाचार उघड.

दाटे ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याने त्याची चौकशी करून संबंधित सरपंच, उप सरपंच/सदस्य व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करणेबाबत दाटे ग्रामस्थांकडून गट विकास अधिकारी, पंचायत समिती, चंदगड यांचेकडे दि.९.७.२०२१ रोजी तक्रार दाखल केली होती.मात्र त्यांच्याकडून चौकशी करण्यास टाळाटाळ केल्याने दि.२३.५.२०२२ रोजी मा. लोकायुक्त, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्याकडे तक्रार केली. मा. लोकायुक्त दिलेल्या निर्देशानुसार गट विकास… Continue reading दाटे ग्रामपंचायतीत २०१० ते २०२० कालावधीत लाखोंचा भ्रष्टाचार उघड.

केपींचा मास्टरस्ट्रोक ! ए.वाय पाटलांचा गटच केला रिकामा

राधानगरीच्या राजकीय चक्रव्युहात ए.वाय.पाटील याना अनेक संदर्भाने घेरले असताना त्यांचेच विश्वासू बिनीचे शिलेदार असणाऱ्या वजनदार मडळीनी ए .वाय. याना बाय-बाय करत मां.आमदार के .पी. पाटील यांना पाठबळ देवून तुम्हीच आमचे नेते असल्याचा विश्वास व्यक्त केल्याने राधानगरीच्या राजकीय सारीपाठावर नवे सदर्भ तयार झाले असुन के.पी.पाटील यांच्या राधानगरीतल्या इलेक्टीव्ह मेरीटला बळकटी प्राप्त होणार असल्याची चर्चा होताना दिसते.… Continue reading केपींचा मास्टरस्ट्रोक ! ए.वाय पाटलांचा गटच केला रिकामा

ए.वाय .गेले तरी केपीनी भक्कम पॅनल तयार केले

चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या व 218 गावाचा समावेश असलेल्या बिद्री साखर कारखाना निवणुकीचा हाय-व्होल्टेज धमाका सुरू आहे.बिद्री निवडणूक पार्श्वभूमीवर माजी आमदार के पी पाटील यांचे मेहुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी के पी ना अलविदा देत विरोधी आघाडीला साथ दिली.खास.संजय मंडलिक,आम.प्रकाश अबीटकर,समरजीत घाटगे यांच्या व्युहरचनेला काही अंशी यश आले असले तरी बिद्रीच्या रणसंग्रामात… Continue reading ए.वाय .गेले तरी केपीनी भक्कम पॅनल तयार केले

‘भोगावती’ वाचविणारच : धैर्यशील पाटील कौलवकरांचा ठाम निर्धार

भोगावती गव सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील- कौलवकर यांचा मी नातू आहे. इतर नेते मंडळींशी माझे काही देणे-घेणे नाही; परंतु भोगावती कारखाना ज्यांनी स्थापन केला त्या आजोबांची शपथ घेऊन सांगतो हा भोगावती साखर कारखाना सर्वसामान्य सभासदांच्या बळावर मी वाचविणारच, असा ठाम निर्धार ‘भोगावती ‘ माजी अध्यक्ष व दादासाहेब पाटील- कौलवकर आघाडीचे प्रमुख नेते धैर्यशील… Continue reading ‘भोगावती’ वाचविणारच : धैर्यशील पाटील कौलवकरांचा ठाम निर्धार

आबिटकरांना कानपिचक्क्या ! भोगावतीच्या शेतकऱ्याची पोस्ट तुफान व्हायरल

बिद्री कारखान्याची रणधुमाळी जोरात चालू आहे . बिद्री कारखाना हा कर्जमुक्त असून पलीकडच्या बाजूला भोगावती वर ५३९ कोटीचे कर्ज आहे आमदार आबिटकर बिद्री कारभारावर जाधव गुरुजी ना पुढे करत टीका करत आहेत मात्र एका भोगावती कारखान्याच्या सभासद शेतकऱ्याने भोगावतीच्या व्यथा मांडत राधानगरी चे तुम्ही आमदार आहात तर तुम्ही भोगावतीवर का बोलत नाही असा  तिखट प्रश्न… Continue reading आबिटकरांना कानपिचक्क्या ! भोगावतीच्या शेतकऱ्याची पोस्ट तुफान व्हायरल

भोगावती कारखाना निवडणुकीत सभासदांचा कल धैर्यशील पाटील-कौलवकरांकडे ?

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून या निवडणुकीत माघारीनंतर रंग भरणार आहे.सध्यस्थितीत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी चर्चा चालू असून त्या फक्त वरवरच्या चर्चा असल्याचे सभासदांकडून बोलले जात आहे.सध्या कारखान्यावर आ.पी.एन.पाटील यांची एकहाती सत्ता आहे.तत्कालीन अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी कारखाना सुस्थितीत चालवूनही त्यांना नोकरभरती भोवली.आ.पी.एन.पाटील काहीतरी मोठा बदल करतील व सभासदांना… Continue reading भोगावती कारखाना निवडणुकीत सभासदांचा कल धैर्यशील पाटील-कौलवकरांकडे ?

चंदगड पोलीस स्टेशनसमोर महिलेचा आत्मदहन करण्याचा इशारा

आत्मदहन करण्याचा इशारा

चंदगड तालुक्यातील अवैद्य धंदे, मटका, घरफोडी, गोवा बनावटीची दारू ,नुकताच उघडकीला आलेलं ढोलगरवाडी येथील ड्रग्ज प्रकरण, यामूळे चंदगड तालुक्यात पोलीस जाग्यावर आहेत की नाहीत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. राजकिय वरदहस्तामुळेच पोलीस यंत्रणा सुस्त झाली आहे अशी चर्चा चंदगडच्या नागरिकांमध्ये सुरू आहे.दोन महिण्यापूर्वी दाटे येथील ग्रामसभेत सौ. सरीता प्रकाश कांबळे हिला शिवाजी मारुती शिंदे, पांडुरंग… Continue reading चंदगड पोलीस स्टेशनसमोर महिलेचा आत्मदहन करण्याचा इशारा