केपींचा मास्टरस्ट्रोक ! ए.वाय पाटलांचा गटच केला रिकामा

राधानगरीच्या राजकीय चक्रव्युहात ए.वाय.पाटील याना अनेक संदर्भाने घेरले असताना त्यांचेच विश्वासू बिनीचे शिलेदार असणाऱ्या वजनदार मडळीनी ए .वाय. याना बाय-बाय करत मां.आमदार के .पी. पाटील यांना पाठबळ देवून तुम्हीच आमचे नेते असल्याचा विश्वास व्यक्त केल्याने राधानगरीच्या राजकीय सारीपाठावर नवे सदर्भ तयार झाले असुन के.पी.पाटील यांच्या राधानगरीतल्या इलेक्टीव्ह मेरीटला बळकटी प्राप्त होणार असल्याची चर्चा होताना दिसते.

 

बिद्री साखर कारखान्याचे निवडणूक रणसंग्रामात ए.वाय.पाटील यानी मंत्री नाम.हसन मुश्रीफ आम.सतेज पाटील व के.पी.पाटील याच्या विरोधात घेतेलेली भूमिका व आम.प्रकाश अबिटकराशी केलेली हातमिळवणी ही निवडणूक रणागंणात कुणालाही पसंद नव्हती. बिद्रीच्या दारुन पराभवनंतर त्याना स्व चितंनाचा पर्याय उभा राहिला आशा अवस्थेतच त्याचे शिलेदार  नेतृत्वातील चोखंदळ गुण व समाजकारणातील चांगली नितीमत्ता हा पर्याय पुढे ठेवून मा.आमदार के .पी.पाटील हेच सक्षम लोकनेते असल्यावर शिक्कामोर्तब करुन त्यांनी साथसंगत करण्याचे ठरवले आहे.

राधानगरीतल्या चा मातब्बर युवा नेते, गोकुळ सचालक प्रा.किसन चौगले, मा.जि .प.सदस्य वि नय पाटील, सुभाष कलिकते, एकनाथ पाटील, युवराज वारके, नानासो पाटील,विश्वास पाटील,  सचीन पाटील,बाजी राव पाटील,अशोक पाटील, वसतराव पाटील, भिकाजी चौगले,धनाजीराव पाटील, रघूनाथ पाटील , अशोकराव चौगले आदिसह मंडळीनी  के.पीं .ना  दिलेली साथ उद्याच्या लोकसभा विधानसभा निवडणू कीत नवे सदर्भ जूळतील 


तर राधानगरीतील हॅट्रीक रोखली जाईल अस  समीकरण तयार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आशी चर्चाही जोर धरून आहे. एकूणच ए.वाय.यांना  .धोबीपच्छाड डावाची हाबकी सोसावी तर लागेल अन् उद्याच समाजकारण राजकारण काय हा अनुत्तरीत प्रश्न त्यांंच्या समोर असेल एवढ मात्र खर.