चंदगड पोलीस स्टेशनसमोर महिलेचा आत्मदहन करण्याचा इशारा

आत्मदहन करण्याचा इशारा

चंदगड तालुक्यातील अवैद्य धंदे, मटका, घरफोडी, गोवा बनावटीची दारू ,नुकताच उघडकीला आलेलं ढोलगरवाडी येथील ड्रग्ज प्रकरण, यामूळे चंदगड तालुक्यात पोलीस जाग्यावर आहेत की नाहीत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. राजकिय वरदहस्तामुळेच पोलीस यंत्रणा सुस्त झाली आहे अशी चर्चा चंदगडच्या नागरिकांमध्ये सुरू आहे.
दोन महिण्यापूर्वी दाटे येथील ग्रामसभेत सौ. सरीता प्रकाश कांबळे हिला शिवाजी मारुती शिंदे, पांडुरंग परशराम नाईक,विजय निंगोजी खरूजकर, धाकोबा गोपाळ गुरव, राजू अनंत खरूजकर, ज्ञानेश्वर मोरे यांनी जातीवाचक शिव्या देऊन लज्जास्पद वर्तन केले.
गेले दोन महिने कायद्यात तरतूद अगदी स्पष्ट असताना त्याचे पालन न करता केवळ राजकिय दबावामुळे संबंधितावर कारवाई करण्यास व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत आहे. अनुसुचित जातीतील महिला असून सार्वजनिक ठीकाणी जातीवाचक शिवीगाळ करून अन्याय झालेला असताना तसेच या प्रकरणी साक्षी पुरावे असताना देखील कायदयानुसार न्याय मिळण्यास झगडावे लागते ही बाब खूप शरमेची आहे. कायद्याचे रक्षण करणारेच जर भक्षक ठरत असतील तर गरीब जनतेने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्तिथ केला जात आहे
अट्रोसिटी कायद्यांतर्गत संबंधित इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला नाही तर तसेच गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांचेवर गुन्हा दाखल केला नाही तर चंदगड पोलीस स्टेशनसमोर आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे दिलेल्या निवेदनात सौ. सरीता प्रकाश कांबळे यांनी दिला आहे.