ए.वाय .गेले तरी केपीनी भक्कम पॅनल तयार केले

चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या व 218 गावाचा समावेश असलेल्या बिद्री साखर कारखाना निवणुकीचा हाय-व्होल्टेज धमाका सुरू आहे.बिद्री निवडणूक पार्श्वभूमीवर माजी आमदार के पी पाटील यांचे मेहुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी के पी ना अलविदा देत विरोधी आघाडीला साथ दिली.खास.संजय मंडलिक,आम.प्रकाश अबीटकर,समरजीत घाटगे यांच्या व्युहरचनेला काही अंशी यश आले असले तरी बिद्रीच्या रणसंग्रामात पालकमंत्री हसन मुश्रीफ,व आम सतेज पाटील यांचे पाठबळ के पी च्या सत्तारूढ आघाडीला राहिली आहे.  बिद्रीच्या या महासंग्रामात सत्तारूढ आघाडीकडे दीर्घकाळ बिद्रीचे चेअरमन अशी ओळख राहिलेले माजी आमदार दिनकरराव जाधव,राधानगरी भुदरगडचे माजी आमदार बजरंग आण्णा देसाई,कागलचे माजी आमदार संजयबाबा घाटगे व राधानगरी,सरवडे येथील बिद्रीचे माजी व्हा.चेअरमन कै. विजयसिंह मोरे यांची ताकद सत्तारुढ गटाचे नेतृत्व करणारे नेते बिद्रीचे चेअरमन के पी पाटील यांच्याशी राहिल्याने बिद्रीत श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीला बळ देणारे ठरले आहे

ए वाय पाटील यांनी बिद्रीच्या चेअरमन पदाची घातलेली अट डावलली म्हणून विरोधी आघाडीची साथ संगत केली आहे.बिद्रीच्या सक्षम कारभारावर गेले 19 वर्षे चेअरमन असणारे के पी पाटील चांगल्या कारभाराची हे इथल्या चांगल्या कारभाराचे नेते असल्याने चेअरमन पदाची ए वाय यांची मागणी रास्त कशी? याबद्दल कार्यक्षेत्रात चर्चा होताना दिसतात.बिद्रीच्या गत निवडणुकीत ए वाय पाटील शाहूचे चेअरमन समरजीत घाटगे,बिद्रीचे माजी व्हा.चेअरमन बाबासाहेब पाटील,आदी मंडळी खासदार मंडलिक,आम अबीटकर यांचे बरोबर जरी गेली असली तरी बिद्री कार्यक्षेत्रातील हे तीन वजनदार माजी आमदार  व राधानगरी सरवडे येथील मोरे घराणे सत्तारूढ आघाडीतून हरकत घेऊन गेलेल्या नेत्यांची मोकळीक बिद्रीत भरून काढतील अशी चर्चा जोर धरून आहे.एकूणच बिद्रीत के पी ना मिळालेले पाठबळ राजकीय ताकद सिद्धा करणारे ठरले आहे.