भोगावती सत्ताधारी आघाडीला सुरुंग

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.सत्ताधारी आघाडीच्या भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमुळे सभासदांमध्ये तीव्र रोष निर्माण झालेला आहे.साखर चोरी, ताडपत्री चोरी भंगार चोरी,पाणंदी दुरुस्तीसाठी बोगस खर्च, संचालकांचे बोगस प्रवास भत्ते,शेतकी कार्यालय बांधणीसाठी झालेला तब्बल २७ लाख खर्च, कोर्ट केससाठी कोट्यवधी खर्च अशी विविध प्रकरणे बाहेर येत आहेत

कामगारांचा ७ महिन्यांचा पगार थकीत आहे.बोनसही नाही.या दिवाळीत बोनस व पगार नसल्याने कामगारांनी संप चालू केलेला आहे.

 

सभासदांमध्ये उठाव होत असताना,कामगारांचाही पाठींबा धैर्यशील पाटील-कौलवकर यांच्या आघाडीला मिळाल्याने संस्थापक कौलवकर आघाडीची शिट्टी वाजणार हे स्पष्ट होत आहे.भोगावती कारखान्याच्या निवडणुकीचा इतिहास पहाता ज्या आघाडीला कामगारांचा पाठींबा मिळालेला आहे त्या आघाडीचा विजय झालेला आहे. या निवडणुकीतही कामगारांच्या पाठिंब्याने कौलकर आघाडीचा विजय निश्चित झालेला आहे.