मामानं डायरेक्ट बड्या नेत्यांनाच विचारलं …..आम्ही तुम्हाला मतदान का करायचं?

कौलव : राधानगरी तालुक्यातील भोगावती नदीकाठच्या आध्यात्मिक पवित्र जपणाऱ्या एका गावात सत्ताधारी मंडळींचा संपर्क दौरा होता तेथे बड्या नेत्यासह उमेदवार ही उपस्थित होते आपल्या सत्ताधारी आघाडीला निवडून देण्याचे त्यांनी उपस्थित मतदारांना आवाहन केले त्याचवेळी एक मामा दादासाहेब पाटील कौलवकर आघाडीचे आकडेवारी सह प्रसिद्ध केलेले माहितीपत्रक हातात घेऊन बड्या नेत्यांसमोर आला आणि ती आकडेवारी धडाधड वाचून तुमचा कारभार जर असा असेल आणि आम्हाला तुम्ही साखरच देत नसशीला तर तुम्हाला मतदान आम्ही का करायचं असा थेट प्रश्न विचारला….