पी.एन.पाटील निरुत्तर जेष्ठ सभासदाची साखरेसाठी विचारणा

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत उद्याचा प्रचाराचा शेवटचा दिवस उरलेला आहे.तीनही आघाड्यांनी प्रचाराचे रान उठवलेले आहे, पण बहुतांशी ठिकाणी सत्ताधारी आघाडीला प्रश्न विचारले जात आहेत.मोहडे ता. राधानगरी येथे सत्ताधारी आघाडीचा प्रचार दौऱ्यावेळी सभेमध्ये भाषण चालू असताना एक ज्येष्ठ सभासद उठून उभे राहिलेत व कारखान्याचे विद्यमान चेअरमन आ.पी.एन. पाटील यांना प्रश्न केला साहेब आमच्या साखरेचे काय? साखर चोरीवर का बोलत नाही? पाच वर्षे झाली साखर नाही.

सभासदाच्या या प्रश्नावर आ.पी.एन पाटील यांनी निरुत्तर होऊन हसण्या पलीकडे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.साखर चोरी व सभासद साखर या विषयावर निवडणूक गाजत असताना विद्यमान चेअरमन यावर बोलत नाहीत याबद्दल सभासदांमध्ये नाराजीचा सूर आहे.धैर्यशील पाटील कौलवकरांसाठी ही जमेची बाजू असल्याचे बोलले जात असून कौलकर आघाडीचे निवडणुकीतील पारडे जड होत आहे.