भोगवतीत पी एन पाटलांना दे धक्का ? कौलवकरांची प्रचारात आघाडी

कौलव : भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून यानिमित्ताने दादासाहेब पाटील – कौलवकर आघाडीच्या पदयात्रांचा झंजावात आता प्रत्येक गावात पोचत आहे. या पदयात्रेमध्ये स्थानिक युवक आणि ज्येष्ठ सभासदही मोठ्या संख्येने सहभागी होत असून कौलवकर आघाडीच्या या पदयात्रांना रोज मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कार्यक्षेत्रातील सभासद आपल्या गावात कौलवकर आघाडीची प्रचार सभा व्हावी असा आग्रह आघाडीचे प्रमुख नेते धैर्यशील पाटील – कौलवकर व सर्व उमेदवारांकडे करत आहेत. परंतु वेळेची मर्यादा असल्याने कौलवकर आघाडीने पदयात्रांवर भर दिला आहे. या पदयात्रेमधून स्वतः आघाडीचे नेते धैर्यशील पाटील – कौलवकर व सर्व उमेदवार प्रत्येक सभासदाला गावोगावी भेटत आहेत. 

धैर्यशील पाटील हे आपण ही निवडणूक का लढत आहोत याबाबतची कारणे समजावून सांगत आहेत. साहजिकच सभासद त्यांच्यासह सर्व उमेदवारांचे गावोगावी मोठ्या जल्लोषात स्वागत करीत आहेत. पदयात्रेच्या सुरुवातीला असलेल्या सभासदांच्या व समर्थकांच्या संख्येत पदयात्रा ज्या गावात पोहोचेल तेथील समर्थक सभासदांची मोठी भर पडत असून यामध्ये युवकांसह प्रामुख्याने ज्येष्ठ सभासदांचा सहभाग वाढत आहे.  याच्या जोडीलाच  हळदीकुंकू देण्याच्या निमित्ताने कौलवकर महिला प्रचारकांचे घरोघरी संपर्क अभियान सुरू असून त्यालाही महिला वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. एकूणच पुरुष आणि महिला प्रचारक घरोघरी जाऊन शिट्टी या चिन्हावर शिक्का मारून आघाडीला पूर्ण बहुमताने निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत.  सोबत कौलवकर आघाडीची ध्येयधोरणे जाहिरनामा व माहिती पत्रकाच्या रूपाने घरोघरी पोहोचवीत आहेत.  सभासद हा जाहीरनामा वाचून कौलवकर आघाडीला आम्ही निवडून देणारच असे वचन गावोगावी देत आहेत . एकूणच कौलवकर आघाडीच्या पदयात्रा आणि महिलांच्या हळदीकुंकू संपर्क अभियानास गावागावांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे.मात्र दुसऱ्या बाजूला सोशल मीडिया आणि आपला कारभार पोचवताना पी एन समर्थक कमी पडत आहेत असे सध्या चित्र दिसत आहे कौलवकर प्रचारात साखरचोरी , ३५० कोटींचा कर्जाचा बोजा , ७ महिने कामगारांचा थकलेला पगार  असे प्रभावी मुद्दे मांडत आहेत त्यामुळे शिटी ला मिळणारा  प्रतिसाद बघता पी . एन पाटील याना दे धक्का ? असं सध्या तरी चित्र निर्माण झाले आहे